दोडामार्ग (प्रतिनिधी) : सासोती जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे संदेश पारकर यांचे जन आंदोलन सुरू झाले असून शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनाबी सुरुवात करण्यात आली. दोडामार्ग शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालय रस्ता कडेला मशाल चिन्ह असलेले भगवे ध्वज लावण्यात आले होते. या आंदोलनात सासोली ग्रामस्थ यांच्यासह अनेकांचा सहभाग दिसून आला. सासोली येथील जमीन खरेदी व्यवहार फसठणूक झालेल्या ग्रामस्थ यांना न्याय मिळाला पाहिजे खोटे दस्तऐवज तपार करणारे अधिकारी कर्मचारी निलंबित झाले पाहिजे जमीनीत झालेली बेकायदेशीर बांधकामे तातडीने जमीनदोस्त करा अशा घोषणा दिल्या जात होत्या. आंदोलन दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जन आंदोलनात परतीच्या पावसाची हजेरी लावली होती. सकाळी १०.३० वाजता आंदोलनकर्ते संदेश पारकर शिवाजी चौकात दाखल झाले. आंदोलन पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग ओरोस येथून मोठा पोलीस फौजफाटा बोलवण्पात आला होता. दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे पोलिस दंगल पथक तैनात केले होते तहसीलदार कार्यालय येथे जाणारे दोन्ही मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केले होते.