जोपर्यंत सासोली ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. तोपर्यंत आम्ही आमची लढाई सुरू ठेवणार – संदेश पारकर
दोडामार्ग (प्रतिनिधी) : तालुकावासिय व सासोली ग्रामस्थ दोडामार्ग संघर्ष समिती संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर नेतृत्वात श्रीफळ फोडून करण्यात आले. सासोली संघर्ष समितीच्या एकजुटीच्या संघटनेचा विजय असो….! नाव ओरीजिन काम दुप्लिकेट..! कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय..! जमिन आमच्या हक्काची नाही.. कोणाच्या बापाची… ! आदी घोषणा देवुन सासोली ग्रामस्थांनी परीसर दणाणून सोडला.
यावेळी तिलारी संघर्ष समिती संजय नाईक, शंकर गवस, महेश ठाकूर , रत्नदीप सावंत,सायली परब, सतीश गावडे, संदेश भुजबळ, मनोज गवस, विजय ठाकूर, सायली परब, अर्चना गवस, अक्षय परब भिवा सावंत, नारायण गवस, उपेंद्र गवस, अंकुश नाईक, संतोष फाले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सासोली ग्रामस्थांवर होणाऱ्या अन्यायाबाबत न्याय मागण्यासाठी हे आम्हीं जनआंदोलन हाती घेतले आहे. कुठल्याही खात्याची परवानगी नसताना. या दि ओरिजीन कंपनीने खोटा काम दोडामार्ग तालुक्यासह सासोली गावात केलेलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दोडामार्ग तहसिलदार कार्यालयासमोर दोडामार्ग तालुका वासिय आणि सासोली ग्रामस्थांनी उपस्थीत रहावे. असं आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सासोली ग्रामस्थ संघर्ष समिती कार्यालय उद्घाटन प्रसंगी केले..!

