गावातील जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
आचरा (प्रतिनिधी) : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ” लाभार्थी महिलांची कागद पत्र गोळा करण्यासाठी होणारी परवड तसेच या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा, गावातील महिला योजने पासून वंचित राहू नये. या उदात्त हेतूने चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शनिवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने शिबीराचे आयोजन केले आहे.
यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, जन्म दाखला-अधीवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत या कागद पत्राची आवश्यकता असून उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, तलाठी, सर्कल आदी उपस्थित राहणार असून सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गावातील 21 ते 60 वयोगटातील महिला लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंदर ग्रामपंचायतिच्या वतीने सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे यांनी केले आहे.












