वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत बौध्द विकास मंडळाचे अध्यक्ष गणपत भिकाजी कांबळे वय ८५ यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. मुंबई महानगर पालिकेतून सेवानिवृत्त होते. सेवा निवृत्तीपर्यंत मुंबई मंडळाचे सचिव तर सेवानिवृत्तीनंतर ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.वैभववाडी तालूका बौध्द सेवा संघांचे जेष्ठ कार्यकर्ते होते. बौध्द समाजाच्या पाणी, रस्ता, लाईट या प्राथमिक सुविधा मिळवण्यासाठी त्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. हेत येथे १९७६ साली भुईबावडा विभागातील पाहिले समाज मंदिर उभारणी तसेच हेत येथील बुद्ध विहार उभारणीत महत्वाची भूमिका होती. सर्वांच्या सुख दुखात धावून जाणाऱ्या व्यक्तीमत्वच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी, सुना, जावई नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.
हेत बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष गणपत कांबळे यांचे निधन












