मानवता धर्म जपत केली 44 हजारांची आर्थिक मदत
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सावंतवाडी तालुक्यातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील नेहरुन शेख या बलिकेच्या आजारपणात बाळू माने मित्रमंडळ सिंधुदुर्ग ने मदतीचा हात दिला आहे.गोवा बांबुळी येथील रुग्णालयात नेहरून शेख ही बालिका गंभीर आजारावर वैद्यकीय उपचार घेत आहे.बाळू माने मित्रमंडळाच्या वतीने 44 हजार 251 रुपयांची आर्थिक मदत नेहरुन च्या उपचारांसाठी सुपूर्त करण्यात आली. एकीकडे जात धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण होत असताना मानवता हाच धर्म ही शिकवण बाळू माने मित्रमंडळाने घालून दिली आहे. नेहरुन ची कौटुंबिक आर्थिक स्थिती बेताची असल्याने तिच्या आजारपणात वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा हात देण्यासाठी बाळू माने मित्रमंडळा ने पुढाकार घेतला. बाळू माने मित्रमंडळ सिंधुदुर्गच्या सर्व सदस्यांनी यथाशक्ती आर्थिक मदत देऊ केली. त्यातून जमा झालेले 44 हजार 251 रुपये आज बांबोळी येथील रुग्णालयात जात बाळू माने मित्रमंडळ सदस्यांनी नेहरुन च्या नातेवाईकांकडे सुपूर्त केली.












