कणकवली (प्रतिनिधी) : प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून व वेक्सॉन कंपनीच्या प्रेरणा मयेकर यांच्या सहकायार्तून असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशनच्या दिविजा आश्रमातील आजी-आजोबांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषधे देण्यात आली. ही औषधे दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवार ७ नोव्हेंबर रोजी आश्रमाचे व्यवस्थापक संजय शेट्ये यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी कलमठचे ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री, सूर्यकांत हुन्नरे, पत्रकार तुषार हजारे, नितीन उर्फ आबा मेस्त्री, भूषण ठाकूर, सिद्धेश घाडीगावकर, प्रसाद मठकर, निखिल हजारे, राहुल कडुलकर, राज सावंत, नील लोकरे, निश्चिय हुन्नरे यांच्यासह वृद्धाश्रमाचे कर्मचारी उपस्थित होते. आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. शेटये यांनी संदीप चौकेकर व प्रेरणा मयेकर यांचे आभार मानले.
प्राण जीवन संस्थेकडून ‘दिविजा’ला आयुर्वेदिक औषधे












