सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी सामाजिक बांधिलकी जपत

दिवाळीत केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण संभाजी नगर गुरुववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी नुकतीच सामाजिक बांधिलकी जपत वंचित घटकातील गोरगरीब जनतेला दिवाळीं सणानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या जीवनात दिवाळीचा गोड आनंद निर्माण केला आहे.

त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. खारेपाटण पंचशील नगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य जयदीप देसाई, किरण कर्ले, सुधाकर ढेकणे, प्रथमेश गुरसाळे, संतोष रोडी, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आस्था पाटणकर, पंचशील विकास मंडळाचे कार्यकर्ते संदीप पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी यंदाच्या दिवाळीत खारेपाटण येथील सर्व ज्येष्ठ नागरिकां सहित आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नागरिकांना दिवाळी निम्मित जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून ज्येष्ठ नागरिक दुर्बल वंचित घटकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!