गवा रेड्यांचा बंदोबस्त करा नावळे गावातील शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : नावळे गावात गवा रेड्यांचा धुमाकूळ एक एकर भात शेतीचे मोठे नुकसान वन विभागाकडे तक्रार करूनही वनरक्षक नुकसान केलेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी पोचले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गवा रेड्यांचा बंदोबस्त करा नावळे गावातील शेतकऱ्यांची मागणी.
सततच्या पडणाऱ्या पावसाचा फायदा घेत शेतकरी अनंत गुणाजी गुरव यांच्या एक एकर भात शेतीचे गवा रेड्यांच्या कळपाने मोठे नुकसान केले ८ ते १० दिवसांपूर्वी भात शेतीची लावणी पूर्ण करून झाल्यानंतरच गुरुवारी रात्री सात ते आठ गवारे यांच्या कळपाने भात शेतीत घुसून भात लावणी खात पायाखाली तुडवून त्याची वाट लावली यामुळे या शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे सदरील घटनेची खबर वनरक्षक यांना देऊन सुद्धा नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप सायंकाळी उशिरापर्यंत वनरक्षक न गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. वन अधिकारी यांनी वनरक्षकाला आदेश देऊन सुद्धा वनरक्षक सदर घटनेची पाहणी करण्यासाठी शेता पर्यंत पोहोचले नाहीत. सदरील गवा रेड्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नावळे गावातील शेतकऱ्यांकडू होत आहे.