अनिस नाईक यांचा वाढदिवस शिर्डी साईबाबांच्या सानिध्यात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी, तथा पुलांच्या बांधकामांतील नावाजलेले शासकीय ठेकेदार तथा कणकवली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अनिस अब्दुल नाईक यांचा वाढदिवस शिर्डी येथे साईबाबांच्या सॅनिध्यातज्ज्ञ साजरा करण्यात आला. शिर्डी संस्थानचे पदाधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोतेपाटील यांच्या हस्ते अनिस नाईक यांना शाल तसेच साई प्रतिमा भेट देण्यात आली. साईभक्त असलेले अनिस नाईक हे दरवर्षी आपला वाढदिवस श्रद्धेने शिर्डी येथे साजरा करतात. यावेळी इम्रान शेख, निशु कडुलकर, अमित केतकर, केदार खोत, गणेश चौगुले, विशाल पेडणेकर, नितीश सावंत, सचिन अडुळकर, शुभम बिडये, दीपेश सावंत, सागर जाधव, गजानन जाधव, सिद्धेश भात, पपू निमणकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!