बिबवणे येथील वृद्धाचा मृतदेह आढळला कणकवली बस स्थानकात

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ- बिंबवणे मांगलेवाडी येथील अरविंद श्रीपातराव अडसुळे ( वय 65 ) या वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी कणकवली बस स्थानक परिसरात आढळून आला. याप्रकरणी मयत यांचा मुलगा श्रीपातराव अरविंद अडसुळे याच्या फिर्यादीवरून कणकवली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कणकवली बस स्थानक परिसरात एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी कणकवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता त्यांना महेश अडसुळे यांचा फोन नंबर मिळाला होता. त्यानंतर पोलिस श्री. बरड यांनी महेश अडसुळे यांना फोनवरून मृतदेहाची माहिती दिली. मात्र महेश अडसुळे हे मुंबईला असल्याने त्याने कुडाळ बिंबवणे येथील भाऊ श्रीपातराव अडसुळे याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर श्रीपातराव अडसुळे हा कणकवली येथे येत मृतदेहाची ओळख पटवली. त्यावेळी तो मृतदेह अरविंद श्रीपातराव अडसुळे यांचा असल्याचे समजले. श्रीपातराव अडसुळे याने कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अरविंद अडसुळे हे रोड रोलरवर चालक म्हणून काम करत होते. १२ दिवसांपूर्वी अरविंद अडसुळे हे आपल्या मूळ गाव राधानगरी येथे गेले होते. त्यानंतर ते बिंबवणे येथील घरी परतले नव्हते, असे म्हटले आहे.

error: Content is protected !!