खोकुर्ले, मांडुकली रस्त्यावर पुराचे पाणी

गगनबावडा कोल्हापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर  खोकूर्ले, मांडूकली, किरवे दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारीही या महामार्गावरची वाहतूक ठप्पच आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंभी नदीला आलेल्या पुरामुळे  पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खोकुर्ले, मांडुकली दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे रविवारी सायंकाळपासून हा मार्ग ठप्प झाला आहे. या मार्गावरील वाहतूक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. तर कोकणातुन जाणारी वाहातुक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.त्यामुळे संपूर्ण  जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे  सायंकाळी 6 वाजल्यापासून रस्त्यावरचे पाणी ओसरू लागले होते.मात्र रात्री गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने पुन्हा पाणी रस्तावर वाढले. त्यामुळे मंगळवारीही वाहतूक ठप्पच होती.जिल्ह्यातील वाहतूक फोंडा घाटातून राधानगरी मार्गे वळवण्यात आली आहे.

error: Content is protected !!