संरक्षक भिंती गेल्या तुटून
वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने करूळ घाटात भला मोठा डोंगराचा भाग कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे रस्त्याची संरक्षक भिंतीही आहेत. वाहतूळ बंद असली तरी घाटात नूतनीकरणाचे काम करणारे कामगार असतात. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. आठवडाभारतील ही दुसरी घटना आहे.
नूतनीकरणासाठी बंद असलेल्या करूळ घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे.आठ दिवसापूर्वी घाटाच्या मध्ये भला मोठा डोंगराचा भाग रस्त्यावर कोसळून संरक्षण भिंती कोसळल्या आहेत. सुमारे 100 मीटर डोंगराचा भाग रस्त्यावर आला होता. तो डोंगराचा पडलेला भाग काढण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यातच मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान डोंगराचा भाग रस्त्यावर आला आहे. ही दरड एवढी मोठी आहे की पूर्ण रस्ता बंद झाला आहे. या दरडीने रस्ताच्या संरक्षक भिंती कोसळल्या आहेत.
घाटात रस्ता रुंदीकरणासाठी दरड तोडून रस्ता रुंद करण्यात आला आहे. त्यामुळे दरड कटिंग करताना ठिसूळ झालेल्या दरडी वारंवार कोसळत आहेत.











