सामाजिक कार्यकर्ते स्व.विनय पावसकर यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज तळेरे येथे शोकसभेचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते विनय पावसकर यांच्या आकस्मिक निधनानंतर आज गुरुवारी तळेरे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तळेरे गावचे माजी सरपंच तसेच येथील विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले उत्तम कार्यकर्ते आणि आपल्या विनयशील स्वभावाने अनेकांना आपलेसे करणारे विनय केशव पावसकर यांचे आकस्मिक रविवारी दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व सार्वजनिक वाचनालय तळेरे, कासार्डे, साळीस्ते,ओझरम,दारुम पंचक्रोशीतील गावातील विविध संघटना, संस्था, ग्रामस्थ आणि विनय पावसकर यांचा मित्र परिवार यांच्यावतीने आज गुरुवार दि.२५ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ वा. तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्व.सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!