महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने परिक्षेचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे गणित प्रावीण्य परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. इयत्ता पाचवी मधून आयुष्य प्रदीप नाळे आणि हर्ष अजित दिघे, इयत्ता आठवी मधून चिन्मय दशरथ शिंगारे, सलोनी गंगाधर केळकर, वैष्णवी विश्वनाथ चव्हाण ,शिवानी रत्नाकर फुटक यांनी उज्वल यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर विद्यार्थ्यांना एस बी शिंदे, ए जी केळकर ,सौ एस ए सबनीस, एस व्ही भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक एस बी शिंदे, पी.एम.पाटील, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटिल व गणित अध्यापक तसेच इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.












