भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख आम. राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत खर्डेकर महाविद्यालय येथे वृक्षारोपण

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : माजी आमदार तथा भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांचा वाढदिवस वेंगुर्लेत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. तालुक्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दप्तर वाटप, गरीबांना धान्य वाटप, छत्र्या वाटप असे विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित करून वाढदिवस उस्ताहात साजरा करण्यात आला. वेंगुर्ले शहरात ही खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य एम.बी.चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, संस्था प्रतिनीधी सुरेंद्र चव्हाण, विरेंद्र देसाई, मा.प्राचार्य डाॅ.विलास देऊलकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, महीला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ, महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर, महीला जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, किसान मोर्चाचे सत्यवान पालव, युवा मोर्चाचे मनोहर तांडेल व हेमंत गावडे, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ, महीला मोर्चाच्या हसिनाबेन मकानदार, आकांक्षा परब, रसिका मठकर, प्रा.अरविंद बिराजदार, प्रा.डाॅ.वसंत नंदगिरीकर, प्रा.दिलीप शितोळे, प्रा.पी.जी.देसाई, मोहन मोबारकर, इंद्रनिल चौगुले, प्रशांत कांबळे तसेच उद्यानविद्या विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!