खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात मालवण येथील बाजारपेठेतून बाळकृष्ण नारायण परब या ८० वर्षांच्या आजोबांना निराधार स्थीतीत नुकतेच सविता आश्रमात दाखल करण्यात आले. व आश्रमाच्या वतीने त्यांना आधार देण्यात आला.
याबाबत अधिक वृत्त असे की,बाळकृष्ण परब हे वयोवृद्ध आजोबा निराधार स्थीतीत मालवणच्या बाजारपेठेत फिरताना मालवण जोशीवाडा येथील उदय घनः शाम रोगे यांना आढळले. त्यांची माहिती जणून घेतली असता बाळकृष्ण परब यांना सद्यस्थीतीत सांभाळणारे कोणी नसल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर उदय रोगे यांनी पणदूरच्या संविता आश्रमशी संपर्क केला. त्यानुसार संवित आश्रमचे व्यवस्थापन समिती सदस्य व पणदूरचे पोलीस पाटिल देवू सावंत यांनी प्रत्यक्ष मालवण येथे जावून परब आजोबांना ताब्यात घेतले.
दरम्यान मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रविण अशोक कोल्हे यांचे नाहरकत पत्रानुसार बाळकृष्ण परब यांना संविता आश्रमात दाखल करण्यात आले. यावेळी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब,संविता आश्रम व्यवस्थापन समिती सदस्य देवू सावंत व आश्रमातील बांधव शिवा छेत्री हे उपस्थीत होते. सद्या संविता आश्रमचे सेवा कार्यकर्ते वयोवृध्द जेष्ठ नागरिक परब या आजोबांची काळजी घेत आहेत.