मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत सर्वाधिक लाभार्थी असलेल्या गावाला २५ लाख – आ. नितेश राणे

कणकवली तालुका मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा आढावा बैठक ; सरपंच, अंमलबजावणी करणा-या अधिकारी, कर्मचा-यांशी साधला संवाद

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही अतिशय महत्वकांक्षी योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक उन्नती सोबतच स्वावलंबी बनवण्याचा उद्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या संकल्पनेतून ही योजना अंमलात आली. कणकवली तालुक्यात लाडकी बहिण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. ज्या गावांमध्ये सर्वाधिक लाभार्थी असतील त्या पहिल्या गावाला २५ लाख, दुस-या गावाला १५ लाख, तिस-या गावाला १० लाख असा विकास निधी देणार असल्याची घोषणा आ. नितेश राणे यांनी केली. त्यासाठी सकारात्मकदृष्ट्या सर्वच गावांमध्ये स्पर्धा झाली पाहिजे.

कणकवली पंचायत समिती येथील प.पु. भालचंद्र महाराज सभागृहात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कणकवली तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते, या बैठकीला कणकवली प्रांताधिकारी जगदीश काटकर, तहसिलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, महिला बालकल्याण अधिकारी उमा हळदोणेकर व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, नगरपंचायत कर्मचारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या आढावा सभेत आ. नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना महिलांसाठी महत्त्वाची आहे. कणकवली विधानसभा मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला संख्येने जास्त आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी होण्यासाठी सर्व सरपंच व ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांनी काम करावे. ज्या गावांमध्ये अडचणी येत असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी केले. पुढच्या १५ दिवसानंतर पुन्हा बैठक घेतली जाईल.

यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कणकवली तालुक्यातील लाडकी बहिण सरपंच आलेल्या अडचणी मांडू शकता, अनुभव बोलावे.पुढचा प्रवास सुखकर करण्यासाठी हा आढावा आहे.

प्रांताधिकारी जगदीश म्हणाले, ६४ ग्रामपंचायत २० हजार पात्र ठरवली आहे. त्यापैकी १६ हजार ६३६ ऑफलाईन अर्ज जमा झाली आहेत. त्यापैकी 15 हजार ८८ अर्ज ऑनलाईन झाले आहेत. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांकडे या योजनेचे अर्ज प्राप्त आहेत. कणकवली शहरात अंगणवाडी सेविका व नगरपंचायत कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. शहरात १४३५ ऑनलाईन अर्ज आले आहेत. ब-याच अटी या योजनेतील शिथिल केल्यामुळे आता तालुक्यात २८ हजार ३४८ कुटुंब संख्या पात्र होती . सर्व पात्र महिलांना लाभ होणार आहे. पांढरे रेशनकार्ड असलेल्या महिलांना अडीज लाखापेक्षा उत्पन्न कमी असल्याचा दाखला दिला तर ती महिला लाभार्थी होईल.

या आढावा बैठकीत फोंडा, कलमठ, सांगवे, तळेरे व अन्य काही ग्रामपंचायत मध्ये कशापध्दतीने अर्ज दाखल केले. याबाबत मार्दगर्शन केले. इंटरनेट सुविधांबाबत अडचणी असल्यास पंचायत समितीने त्या ग्रामपंचायतींना पर्यायी व्यवस्था करुन द्यावी. अशी सुचना आ. नितेश राणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!