कलमठ बाजारपेठ शाळा क्रं.१ मध्ये गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप
कणकवली (प्रतिनिधी) : सुशांत नाईक यांच्या प्रमूख उपस्थित युवासेना आणि शिवसेना कलमठ यांच्या हस्ते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कलमठ बाजारपेठ शाळा क्रं.१ मध्ये गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. केक कापून आणि अल्प-उपहार देउन केला साजरा. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कलमठ गावातील उ.बा.ठा. युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने गरजू विद्यार्थांना दप्तर,वह्या,कंपास पेटी, चित्रकला वही,पेन,छत्री वाटप करण्यत आले. तसेच विद्यार्थ्यांकडून केप कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,रामदास विखाळे, तालुका प्रमूख वैदेही गुडेकर, विलास गुडेकर, विभागप्रमुख अनुप वारंग व धनश्री मेस्त्री, युवासेना कलमठ शहरप्रमूख धीरज मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, किरण हुन्नरे, अमोल कोरगावकर, अर्चना कोरगावकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.