माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे गावचे सुपुत्र शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेशजी लोके यांच्या वतीने केंद्रशाळा खांबाळे नं.१ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम, उपसरपंच गणेश पवार,सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, तंटामुक्त समिती सदस्य दीपक चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रियांका पवार,माजी सरपंच विठोबा सुतार,माजी उपसरपंच लहू साळुंखे, जेष्ठ ग्रामस्थ शांताराम कदम, बळिराम सावंत,दिनेश पालकर,सूर्यकांत सुतार, राजन साळुंखे,समीर जाधव,जयेश पवार, श्रीकृष्ण पवार,वृषाली पवार, श्रध्दा पवार आदी पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!