चिंदर ग्रामपंचायत सदस्य केदार उर्फ पप्पू परुळेकर यांचे समाजभान

बांदिवडे, भगवंतगड ग्रामस्थांच्या सहकार्याने भगवंत बांदिवडे बंधारा दुरुस्त

आचरा (प्रतिनिधी) : मुसळधार पावसाच्या तडाख्याने भगवंतगड बांदिवडे कॉजवे खचला होता. यामुळे मसुरे पंचक्रोशीतून आचरा येथे जाणारे शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, कामावर जाणारे कामगार, दुचाकी वाहनचालक आदीचे यांचे हाल होत होते.

याची दखल घेत चिंदर ग्रामपंचायत सदस्य केदार उर्फ पप्पू परुळेकर यांच्या पुढाकाराने तसेच भगवंतगड, तेरई, लब्देवाडी, बांदिवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमादानाने सिमेंट, खडी, वाळू, दगड याच्या सहाय्याने बंधारा, कॉजवे दुरुस्त करत समस्या दूर केली. या बद्दल केदार उर्फ परुळेकर आणि ग्रामस्थांनचे सर्व स्थरातून आभार मानले जात आहेत.

error: Content is protected !!