देवगड (प्रतिनिधी) : नैसर्गिक पर्यावरण आणि मानवता विकास संस्था व नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या संयुक्त विदयमाने पर्यावरणपुरक रंगपंचमी उत्सव रविवार 12 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वा. पासून वेळवाडी सडा ओपन जिम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या रंगपंचमी उत्सवात 5 ते 16 वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी पर्यावरण पुरक रंग आणि रंगपंचमी,म्युझिकच्या तालावर साजरी केली जाणार आहे. या उत्सवाला येताना लहान मुलांसोबत पालकांनी येणे अनिवार्य आहे. तरी या आयोजित करण्यात आलेल्या रंगपंचमी उत्सावामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
देवगडमध्ये १२ मार्च रोजी पर्यावरणपुरक रंगपंचमी उत्सवाचे आयोजन












