खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील श्री समर्थ कृपा महिला बचत गटाच्या प्रतिनिधी सौ जागृती पोटले या नुकत्याच दिल्ली येथे केंद्र सरकारच्या वतीने भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात सिंधुदुर्गच्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधी म्हणून जावून आल्याबद्दल व तो सन्मान त्यांना मिळाल्याबद्दल खारेपाटण गावच्यावतीने व खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटणच्या वतीने संस्थेच्या सभागृहात त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार नुकताच करण्यात आला.
या कार्यक्रमाला खारेपाटण सोसायटीचे चेअरमन तथा माजी जि.प वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार,व्हाईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर, माजी पं.स सदस्य व संस्थेच्या संचालिका तृप्ती माळवदे, उज्ज्वला चिके, संचालक – विजय देसाई, इस्माईल मुकादम, भाऊ राणे, एकनाथ कोकाटे, रवींद्र शेट्ये, मंगेश गुरव, अशोक पाटील, संतोष सरफरे, मोहन पगारे,श्रीधर गुरव, संस्थेचे सचिव अतुल कर्ले आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय नवी दिल्ली यांच्यावतीने दी.१९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत ‘वर्ल्ड फूड इंडिया ‘ – २०२४ आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव खारेपाटण येथील श्री समर्थ महिला बचत गटाच्या प्रतिनिधी सौ जागृती जनार्दन पोटले यांची निवड झाली होती. या प्रदर्शनात त्यांनीं आपल्या कोकणातील कोकम बटर,कोकम सरबत व कोकम सोल हे पदार्थ प्रदर्शन व विक्री करीता मांडले होते. खारेपाटण मधील एका सामान्य कुटुंबातील महीलेला बचत गटाच्या माध्यमातून दिल्ली येथे प्रदर्शनात जाण्याची संधी मिळते ही बाब आमच्यासाठी गौरवाची व अभिमानाची असून तिला प्रोस्थाहन व शुभेछा देण्यासाठी खारेपाटण सोसायटीच्या वतीने सौ जागृती पोटले या आमच्या महिला भगिनीचा सत्कार करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र जठार यांनी यावेळी सांगितले.