विजयदुर्ग किल्ल्याची तालुका पत्रकार समितीच्या वतीने साफसफाई मोहीम

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला, युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक वारसा वास्तू म्हणून समाविष्ट करण्यासाठी युनेस्कोची टीम विजयदुर्ग किल्ल्यावर पाहणीस येणार आहे. या निमित्ताने, देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने नुकतीच सफाई मोहीम घेण्यात आली. विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे प्रणेते, राजू परुळेकर यांनी पत्रकार समितीच्या सर्व सदस्यांचे स्वागत केले. यावेळी, समितीचे अध्यक्ष, प्रसाद देवधर उपस्थित होते. युनेस्कोमध्ये किल्ल्याचा समावेश होण्यासाठी, ग्रामस्थांच्या वतीने प्रेरणोत्सव समिती काय काम करते याबद्दल सविस्तर विवेचन,राजीव परुळेकर यांनी केले. स्वच्छता मोहिमेमध्ये, पत्रकार समितीचे अध्यक्ष, अयोध्याप्रसाद गावकर, सचिव, सचिन लळीत, हेमंत कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, राजेंद्र मुंबरकर, श्रीकृष्ण रानडे, बाळा कदम यांच्यासह अनेक पत्रकारांनी सहभाग दर्शवला.

error: Content is protected !!