सिंपन प्रतिष्ठान मुंबईच्या अध्यक्षपदी अनिल तांबे, कार्याध्यक्षपदी डॉ. संदीप कदम, सरचिटणीसपदी बाळकृष्ण जाधव तर खजिनदार पदी दत्ता पवार यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत १९३८ साली संपन्न झालेल्या पहिल्या सामाजिक परिषदेच्या प्रेरणेने संघटनात्मक कार्याबरोबरच संस्थात्मक कार्याचा अंगीकार करुन विधायक आणि रचनात्मक कार्य उभारणीसाठी सकारात्मक तसेच व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्यरत असलेली सेवाभावी संस्था सिंपन प्रतिष्ठान मुंबईच्या अध्यक्षपदी अनिल तांबे, कार्याध्यक्षपदी डॉ. संदीप कदम, सरचिटणीसपदी बाळकृष्ण जाधव तर खजिनदार म्हणून दत्ता पवार यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. या नूतन कार्यकारणी सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कणकवली शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक शिल्प आणि संशोधन केंद्राच्या निर्मितीबरोबरच शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, सहकार असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निवडणूक अधिकारी विजय पडवळ यांच्या अधिपत्याखाली सन २०२४ ते २०२९ या काळाकरिता १७ कार्यकारिणी सदस्यांसाठी सिंपन प्रतिष्ठानची पंचवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. निवडणूक रिंगणात एकूण १९ उमेदवार होते. आयत्यावेळी तीन उमेदवारांनी आपल्या वैयक्तीक कारणास्तव निवडणूक अर्ज मागे घेतल्यामुळे १६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी पडवळ यांनी जाहीर केले. त्यामुळे सिंधुदुर्ग मेडिकोज असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष व रोटरी क्लब ठाणेचे गव्हर्नर डॉ. संदीप कदम यांना सिकृत कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करुन त्यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली. सिंपन प्रतिष्ठान मुंबईच्या कार्यकारिणी मंडळामध्ये पाच वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेली कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे. अध्यक्ष अनिल तांबे, कार्याध्यक्ष डॉ. संदीप कदम, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, खजिनदार दत्ता पवार, उपाध्यक्ष लक्ष्मण चौकेकर, सत्यविजय तांबे, चिटणीस चित्तरंजन कदम, प्रा. वर्षा कदम, अजित धामापूरकर, अंतर्गत हिशोब तपासणीस गोपाळ जाधव तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अशोक कांबळे, बी. एस. कदम, वैशाली यादव, प्रमोद नाईक, मिलिंद चिंचवलकर, संजय धारपवार व ॲड. वर्षा जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!