दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा संपन्न झाला सत्कार सोहळा
खारेपाटण (प्रतिनिधी) : विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना ठाणे पुर्व यांचे विद्यमाने तसेच रोटरी क्लब आँफ ठाणे पूर्व यांच्या सहकार्याने ठाणे पुर्व येथील माध्यमिक शाळा विद्यासागर हायस्कूल,नाखवा हायस्कूल, युनायटेड स्कूल व नानिक हायस्कूल, पि.ई .एज्युकेशन आणि भारत हायस्कूल मधील इयता दहावी आणि बारावीमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शालेय विद्यार्थ्याचा नुकताच सत्कार समारंभ कार्यक्रम व गुणगौरव सोहळा कोपरी,ठाणे येथील मेघदूत सोसायटीच्या हॉल मध्ये संपन्न झाला.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये काजल पासवान,प्रेम ताती,मनिष गेलए, राणी नायक,शुभम बामणे, वैभवी लवळे,अथर्व जिवतोडे, अवनी तेल्हुरे,सागर इरावतीनी, संचिता बांद्रे, निधी कोळी, तन्मय वेलोंडे, आदित्य ठाकरे, पार्थ दळवी, कोमल सुर्वे, श्रीकांत सुबैय्या, अंजली कुमावत,स्वागत पात्रा, उदेशसिंग, हर्श जड्यार तसेच साना कोळेकर, आर्यन मोहिते, गौरी हुजरे,पार्थ करमरकर यांचा समावेश होता.
सर्व गुणवंत विद्यार्थ्याना गुलाबपुष्प ,पारितोषिक व अन्य भेटवस्तू देवून त्यांचा यथोचित सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या सत्कार समारंभ कार्यक्रमाला शशिकांत कोळेकर, विकास कणेकर, राजवाडे, रश्मी कुलकर्णी, लक्ष्मी कासारले, यतीश पुरिल, ज्योती जाधवानी, अरूणा जगियासी मान्यवर उपस्थित होते. यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार पार पडला.तसेच या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी विशेष उपस्थिती होती. त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्याना मौलिक असे मार्गदर्शन केले. यावेळी विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटनेच्या एक कार्यक्षम सदस्या लक्ष्मी कासारते यांनी जीवन आनंद संस्था विरार यांच्या करिता पाच हजार देणगी देण्याचे जाहिर केले.सर्व उपस्थीतांचे आभार मानल्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला व सोहळ्याची सांगता झाली.