मोहन पगारे यांची भारतीय जनता पार्टी खारेपाटण विभाग अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे बौद्धवाडी येथील कार्यकर्ते मोहन पगारे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी खारेपाटण पक्षाच्या अनुसूचित जाती विभागिय अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाचे कणकवली तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या वतीने नियुक्तीचे लेखी पत्र नुकतेच मोहन पगारे याना देण्यात आले. यावेळी तालुकाअध्यक्ष दिलीप तळेकर, रवींद्र जठार, शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, सूर्यकांत भालेकर, भाऊ राणे, राजेंद्र वरूणकर, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मोहन पगारे यांनी नुकताच आपल्या अनेक समाज बांधवांना घेऊन भारतीय जनता पार्टी पक्षात खारेपाटण येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला होता. याबरोबरच मोहन पगारे हे खारेपाटण बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे माजी अध्यक्ष असून खारेपाटण सोसायटीचे विद्यमान संचालक आहेत. तसेच नडगिवे गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आहेत तर नडगिवे बौद्धवाडी येथील पायरी सावक संघ या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!