काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली तर मी तुमची ढाल बनून आम्ही उभे राहणार असा शब्द आमदार नितेश राणे यांनी दिला होता
आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी “जय भीम ….जय संविधान…” चा नारा दिला होता. तसेच आरक्षण आपल्या हक्काच आहे. ते कोणालाही हिसकवून घेता येवू शकत नाही. त्यामुळे आपल्या संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही. असा शब्द दिला होता. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होत असंलेली विकास कामे पाहून कणकवली तालुक्यातील नडगिवे बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी खारेपाटण येथे भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी नडगिवे बौद्धवाडी येथील समाज बांधव श्री मनोहर पगारे, गणेश जाधव, कीर्तिकांत जाधव, दीपक पगारे, यशवंत पगारे, बाबल्या जाधव, अपूर्वा पगारे, विनय पगारे , तन्मय पगारे, हरेश पगारे, रोहित पगारे, सुनील जाधव, हेमंत जाधव, दिनेश पगारे, यशवंत जाधव, अनंत पगारे, सदाशिव पगारे, यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्ष प्रवेश केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, माजी जि.प.वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, माजी सरपंच रमाकांत राऊत,शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल, भाजप कार्यकर्ते राजेंद्र वरूणकर उज्वला चिके,अमित मांजरेकर, खारेपाटण ग्रा.पं.सदस्य किरण कर्ले, जयदीप देसाई आधी प्रमुख भाजप पदाधिकारी उपस्थित होते.