खारेपाटण येथे धम्मचक्र प्रवर्तन दीन उस्ताहात साजरा

१०वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दीन व सम्राट अशोका विजयादशमी दीन उस्ताही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, झुंझार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, खारेपाटण पोलीस पाटील अनिकेत जामसंडेकर, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सरचिटणीस सचिन कोर्लेकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे माजी अध्यक्ष पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे शिक्षक मिलिंद सरकटे, आरोग्य सेवक संतोष जुवाटकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटण मुंबई शाखेचे खजिनदार दिनेश पाटणकर, तसेच संघटनेचे कार्यकर्ते सागर पोमेडकर, महेंद्र कदम, सत्यवान जाधव, दीपक जाधव व स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते अशोक पाटणकर, धीरज जुमलेकर, प्रथमेश कदम, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पंचशील विकास मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र कदम व संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ आकांशा पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण चे अध्यक्ष सी. पी. कांबळे व चिटणीस सचिन कोर्लेकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संघटनेचे बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर यांनी धार्मिक बुद्धपुजा पाठ घेतला व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मियांना दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे पठण केले. यामध्ये सर्व बांधवांनी सामुदायिकरित्या सहभाग घेतला.

यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवंगत धम्म बांधव प्रशांत यशवंत पाटणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांच्या सौजन्याने समजतील १० वी /१२ वी
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट वस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थी व महिलांसाठी विविध फणी गेम चे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.त्यामध्ये लहान थोर सर्वांनीच सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी सरपंच श्री रमाकांत राऊत, सामजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, संघतेनेचे कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे, सचिव सचिन कोर्लेकर खारेपाटण केंद्र शाळेचे शिक्षक मिलिंद सरकटे आदींनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाला शुभेछा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र्सांचालांन व आभार मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!