खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ शारदोस्तव कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत शारदोस्तव कार्यक्रम शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्ताही व आनंदी वातावरणात संपन्न झाला. प्रारंभी सरस्वती मातेच्या मूर्तीचे वाजत गाजत शाळेत आगमण झाले यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीस विद्यार्थी, शिक्षक, पालक यांसह शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. यानंतर शारदामातेचे पूजन करण्यात आले. व सामुदायिक आरती घेण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी भजने म्हटली. तसेच शाळेच्या वतीने मुलांचे विविध फानिगेम घेण्यात आले. तर सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गरबा नृत्य मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव, ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तर खारेपाटण केंद्र शाळा येथील शारदोस्तव कार्यक्रमाला खारेपाटण हायस्कूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव – महेश कोळसुलकर, संचालक विजय देसाई, आदीनी सदिच्छा भेट दिली व कार्यक्रमाला शुभेछा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!