सलग दुसऱ्या वर्षी देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी
मराठी रंगभूमी दिनानिम्मित एस.के.प्राॅडक्शन हाऊस चे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : एस.के.प्राॅडक्शन हाऊस प्रस्तुत आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा वर्ष दुसरे याचे आयोजन मराठी रंगभूमी दिनानिमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता मुंबई, पुणे, दौड ,गोवा, गडचिरोली अशा ठिकाणाहून असंख्य दिग्गज कलाकारांनी या स्पर्धसाठी सहभाग दर्शविला होता. प्रत्येक स्पर्धकांनी उत्तमोत्तम सादरीकरणने केली.पदार्पणाच्या वर्षी एस. के. प्राॅडक्शन हाऊस च्या या एकपात्री अभिनय स्पर्धेला उस्पुर्त प्रतिसाद मिळाला. तर याही वर्षी या स्पर्धेला त्याहीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. तर यावर्षी प्रथम क्रमांक: कु सत्यवान गावकर,द्वितीय: सुरेंद्र गुजराथी,तृतीय: राधाकृष्ण परब यांनी ही मनाची बक्षिसे जिंकली. एस. के.प्राॅडक्शन हाऊस तर्फे सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले गेले.












