कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने बहुजन समाजावर फार मोठा अन्याय केलेला आहे त्याचा परिणाम म्हणजे येत्या विधानसभेत महायुतीचा दारुण पराभव होणार आहे तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा सर्व सामान्यांचे नेते शिवसेना महाविकास आघाडीचे उमेद्वार सन्मा. संदेश पारकर हे बहुजन समाजाच्या साथीने विधानसभेत पोचणार आहेत . असा विश्वास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमु संदीप कदम यांनी व्यक्त केला आहे .
महाराष्ट्र शासनाने मराठा आणि धनगर समाज यांना आरक्षण दिलेले नाही त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आरक्षणाची 50% ची मर्यादा वाढवण्यासाठी शिफारस करणे आवश्यक होते मात्र स्थानिक स्तरावर मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आणि या दोन्ही समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये महायुती सरकारला फार मोठे अपयश आलेले आहे तसेच धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानंतर आता दहा वर्षे झाली तरी देखील धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सरकारी उद्योग विकण्याचं काम केल्याने त्या उद्योगांमध्ये काम करत असलेल्या हजारो आरक्षित प्रवर्गातील लोकांना नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे .महाराष्ट्र शासनाने अडीच लाख नोकर भरती प्रलंबित ठेवली आहे . सदर नोकर भरती न केल्याने आरक्षित समाजाच्या लाखो बेरोजगारांना नोकरी पासून वंचित रहावे लागले आहे .तसेच शासकीय नोकर भरती न केल्याने शासकीय कर्मचाऱ्यांवर फार मोठा ताण निर्माण झाला आहे .
केंद्र सरकारने अधिकारी म्हणून अनेकांना नियुक्ता दिल्या आहेत . बहुजन समाजातील मुलं एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांसाठी वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात मात्र केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारच्या परीक्षा न घेता क्लास वन अधिकारी म्हणून आपल्या मर्जीतील लोकांना नियुक्त्या दिल्या आहेत . तसेच अनेक स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटी मुळे बेरोजगारां मध्ये असंतोष निर्माण झाला आहे .
मोठी नाराजी अनुसुचित जाती प्रवर्गात निर्माण झाली आहे . सदर क्रिमिलेअर ची अट लावल्याने अनेक योजना पासुन व सुविधा पासुन अनुसुचित जाती बांधवांचे मोठे नुकसान होणार आहे .
कणकवली विधानसभा मतदारसंघात डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत फार मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे त्यामध्ये बेंच खरेदी ,सोलर लॅम्प खरेदी,ओपन जिम साहित्य खरेदी या योजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्या कारणाने अनुसूजीत जातीच्या वाड्या – वस्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. सदर बाबत निषेध करण्यासाठी अनुसुचित जाती प्रवर्गातील समाजाच्या वतीने फार मोठा मोर्चा कणकवली प्रांत कार्यालयावर काढण्यात आला होता .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीचा विकास करून अशी घोषणा केली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दादरच्या चैत्यभूमीवर भूमिपूजन समारंभ करण्यासाठी आणले होते सदर कार्यक्रम मोठा गाजावाजा करून करण्यात आला मात्र चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य स्मारक झालेले नाही .
मागासवर्गीयांना पदोन्नती पासून वंचित ठेवण्याचे काम युती सरकारने केल्या करणारे महाराष्ट्र शासनातील लाखो कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची हमी युती सरकारने दिली होती मात्र जुनी पेन्शन योजना न दिल्याकारणाने कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठे नाराजी आहे या नाराजीचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल .
तसेच मोठ्या प्रमाणामध्ये महागाई ,भ्रष्टाचार आरोग्याच्या असुविधा ,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसणे यामुळे सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे या सर्वाचा परिणाम म्हणून बहुजन समाज मोठ्या प्रमाणात युती सरकारच्या विरोधात मतदान करून पराभव करण्यासाठी उत्सुक आहे तसेच कणकवली विधानसभा मतदार संघात बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी संदेश पारकर विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख समाजभुषण संदीप कदम यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे .











