कुडाळ (प्रतिनिधी) : शहरातील तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर वय वर्षे ३६ या महिलेने आपल्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून पंख्याला घळफास घेत आत्महत्या केली असल्याची तक्रार संजय विष्णू कुडाळकर वय वर्षे ५१ गणेश नगर कुडाळ, यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात केली आहे.तन्वी कुडाळकर हिला दोन मुलगे, पती सिद्धिविनायक कुडाळकर, एक दीर, भावजई असा परिवार आहे. तन्वी हिने आत्महत्या केल्याची समजताच गणेशनगर सह कुडाळ शहरात नागरिकांकडुन हळवल वेक्त केला जात आहे.
आत्महत्या झाल्याची खबर मिळताच त्वरित सकाळी ९.१५ वाजता कुडाळ पोलीस घटनास्थळी आले असता घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूमची कडी आतील बाजूने उघडलेली होती.तन्वी ची आत्महत्या राहत्या घरी रविवारी २६जुलै रात्रौ ११ ते, सोमवार २७जुलै सकाळी ८ वाजेपर्यंत झाल्याचा प्राथमिक अंदाज कुडाळ पोलिसांनी वेक्त केला जात आहे. काल रविवारी तन्वी कुडाळकर ही तिचे पती सिद्धिविनायक कुडाळकर यांच्या सोबत कासारटका देवस्थान येथे स्नेहभोजना साठी गेली होती त्या नंतर स्रेहभोजन झाल्यानंतर सायंकाळी परत घरी देखील आली होती. त्यामुळे तन्वीच्या बाबतीत नक्की आत्महत्या? की, अजुन काय? ते, अजुन स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री.अवताडे करत आहेत.












