शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना बिस्कीट आणि पंढरपूर येथून विशेषत्वाने आणलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या उपक्रमाप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका सचिव गुलजार काझी, माजी तालुकाप्रमुख अशोक रावराणे, तालुका महिला संघटक दिव्या पाचकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष रविंद्र चव्हाण, विभागप्रमुख यशवंत गव्हाणकर,नगरसेवक बंडू सावंत,दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!