नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन नोंदणीकृत असलेले एकमेव ईस्टेट एजंट आनंद पारकर यांचा वाढदिवस कणकवलीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्तरातून आनंद पारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आनंद पारकर हे कणकवली शहरातील सर्वपरिचित असे नाव असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इस्टेट एजंट क्षेत्रात त्यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांना भेट देत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गवाणकर हार्डवेअरचे मालक गौरव गवाणकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे राजू गवाणकर, महेश नार्वेकर, रवींद्र बाणे आदी उपस्थित होते.