मंगेश गांवकर यांनी मानले मालवण तालुक्यातील मतदारांचे आभार
आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या महाविजया नंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. या विजयात मेहनत घेणाऱ्या मालवण तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे व मतदार बंधू, भगिनींचे शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गावकर यांनी जाहीर आभार मानले आहेत.
कुडाळ-मालवण मतदार संघाचे किंगमेकर ठरलेले शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत हे नुतन आमदार निलेश राणे यांच्या साथीने गेल्या 10 वर्षातील बेॅकलॉग भरून काढत कुडाळ-मालवण भागाचा कायापालट करतील असा विश्वास शिवसेना मालवण उपतालुका प्रमुख मंगेश गांवकर यांनी व्यक्त केला आहे.