कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तरंदळे गावची ग्रामदेवता श्री टेवणादेवी मातेची वार्षिक जत्राेत्सव दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, जो भक्त संयम,शांतता व सहनशीलतेने देवीची मनोभावे पूजा करतो त्याच्या घरात ती सदैव तेवत राहून त्याच्यावर होणाऱ्या अन्यायावर मात करून त्यास ठेचून काढते अशी ही टेवणाईच तसेच माहेरवाशीनेच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे.
यावर्षी जत्रेच्या दिवशी मानकऱ्याना आलेल्या अडी -अडचणींमुळे त्यादिवशी देवीचे ताट फिरविणे, ओटी भरणे हे कार्यक्रम होणार नाहीत. तर ते देवीचा हुकूम घेऊन पुढील दिवसात होणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच जत्रा भरून रात्री ठीक 11 नंतर श्री आबा कलिंगन दशावतार मंडळाचे “सूडा अग्नी “हे पौराणिक नाटक झाल्यावर जत्रेची सांगता होणार आहे.तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान समिती तरंदळे यांनी केले आहे.