तथागत नागरी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग या बौद्ध समाजाच्या सहकारी संस्थेचा

३ डिसेंबर २०२४ रोजी कणकवली येथे शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या पहिल्याच बौद्ध समाजाच्या” तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग ” कणकवली या सहकारी संस्थेचा शुभारंभ मंगळवार दि.३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या शुभहस्ते कणकवली येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन सहकार शेत्रात उडी घेतली असून समाजाची पहिली सहकारी संस्था स्थापन करण्याचे मोठे धाडस स्वीकारले आहे.व त्याला सिंधुदुर्गातील संपूर्ण बौद्ध समाजाने भरभरून पाठिंबा देखील दिला आहे. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे संस्था अध्यक्ष अरविंद वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच या उद्घघाटन कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे,कणकवली प्रांत अधिकारी जगदीश कातकर, सार्वजनिक बांधकाम कणकवली कार्य.अभियंता अजयकुमार सर्वगोड कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सि.जि.म.सह.बँकेचे मुख्य कार्य.अधिकारी प्रमोद गावडे, कणकवली सहकारी संस्था निबंधक कृष्णकांत धुळप, मुंबई महानगर पालिका निवृत्त मुख्य अभियंता संजय जाधव, लांजा येथील माता रमाई नागरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष बी. आर. कांबळे, सिं.जि.म.सह.बँकेचे तपासणी विभाग सरव्यवस्थापक डी के पडेलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील विविध खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्र येत जिल्ह्यात सेवाभावी सामाजिक कार्य करण्यासाठी ही सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्था स्थापन करून याद्वारे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता त्याच संकल्पनेतून ही पतसंस्था उभारण्यात आली असून सदर पतसंस्थेचे कार्यालय श्रीधर नाईक गॅस एजन्सी पहिला मजला मराठा मंडळ नजीक नेहरूनगर येथे स्थापन करण्यात आले असून या मंगलमय सोहळ्यास मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी व हित चिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पतसंस्थेचे सचिव सुनील कदम उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!