तथागत नागरी सहकारी पतसंस्थेचा जिल्हाधिकारो श्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या सेवा निवृत्ती कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रत्यक्ष कार्यालयाचा शुभारंभ आज मंगळवार दी.३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या शुभहस्ते कणकवली नेहरू नगर येथे करण्यात आला. तथागत नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष अरविंद वळंजू यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला कणकवली प्रांत अधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे,कणकवली सहकारी संस्था सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप, मुंबई महानगर पालिका सेवा निवृत्त उपमुख्य अभियंता संजय जाधव,सिं.जि.म.सहकारी बँक तपासणी विभाग सर व्यवस्थापक डी.के.पडेलकर,यांसह संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम,सचिव सुनील कदम,मिलिंद सर्पे,मोहन जाधव,सुहास कदम आनंद धामापूरकर,रुपाली पेंडूरकर,विजय कदम ,सिद्धार्थ तांबे,पी डी जाधव आर डी कदम, श्रद्धा कदम,संतोष पाटणकर,सुभाष कांबळे,के.एस कदम,आदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे संपन्न झालेल्या संस्थेच्या उद्घघाटन सोहळा कार्यक्रम प्रसंगी प्रारंभी भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी प्रास्ताविक मध्ये संस्थेच्या आजपर्यंतच्या खडतर प्रवासाचा व कामाचा आढावा घेतला. यावेळी तथागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील व उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

“तथागत नागरी सहकारी संस्थेच्या नावातच अहिंसा व शांतीचा उपासक भगवान बुद्ध असल्यामुळे या संस्थेचे भविष्य हे उज्ज्वल आहे.यात तिळमात्र शंका नाही.तसेच जी सहकारी संस्था सेवानिवृत्त कर्मचारी एकत्र येऊन स्थापन करतात त्या संस्थेची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही.तसेच संस्थेने सर्व घटकांना या संस्थेत सामावून घेऊन समाजाची आर्थिक स्थिती भक्कम करावी.असे भावपूर्ण उदगार जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तथागत नागरी सहकारी संस्थेच्या उद्घघाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले.यावेळी कणकवली तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे, जिल्हा बँकेचे अधिकारी डी के पडेलकर,मुंबई महानगर पालिका सेवानीवृत्त अभीयंता संजय जाधव,सहकारी संस्था निबंधक कृष्णकांत धुळप आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या आर्थिक उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे शेअर होल्डर यांचा शेअर सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.तर संस्थेच्या भाग भांडवल गोळा करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या व संस्थेचे जास्तीत जास्त सभासद बनविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संस्थेच्या प्रमुख हितचिंतक व पदाधिकारी यांचा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यात बौद्ध समाजाची सहकारी संस्था असावी हे आपल्या सर्वांचे स्वप्न होते.परंतु आज हे स्वप्न तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सत्यात उतरत आहे.याचे समाधान मिळत आहे.सहकाराच्या माध्यमातून आपल्या समाजाची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठीं ही संस्था उपयोगी पडणार आहे.तर संस्था शुभरंभ प्रसंगी जाहीर करण्यात आलेल्या “जय भीम समृद्धी ठेव “योजनेच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी मदत होणार असल्याचे भावपूर्ण उदगार संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद वळंजू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले. या उद्घघाटन कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी हितचिंतक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रसिद्ध निवेदक व अभिनेते निलेश पवार यांनी केले.तर आभार मोहन जाधव यांनी मानले. फोटो – कणकवली येथे बौद्ध समाजाच्या ‘तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या नांफलकाचे अनावरण करताना जिल्हाधिकारी अनिल पाटील,प्रांत जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे,संस्था अध्यक्ष अरविंद वळंजू,उपाध्यक्ष सूर्यकांत कदम,डी.के पडेलकर, संजय जाधव इत्यादी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!