विवेक तावडे यांनी सपत्नीक दिली खारेपाटण हायस्कूल ला सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण गावचे सुपुत्र असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री व भारतीय जनता पार्टी पक्षाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांचे मोठे बंधू विवेक तावडे व त्यांच्या पत्नी संगीता तावडे यांनी नुकतीच सपत्नीक खारेपाटण येथील शेठ न.म.विद्यालय खारेपाटण हायस्कूलला सदिच्छा भेट दिली.

यावेळी खारेपाटण हायस्कूल चे पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी त्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या शाळेचा नावलौकिक पाहून शाळा भेटीसाठी आपण आलो असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विवेक तावडे आणि त्यांच्या पत्नी संगीता तावडे यांनी प्रशालेच्या संपूर्ण परिसराची व प्रशालेच्या इमारतीची पाहणी केली. प्रशालेतील प्रशस्त आणि सुसज्ज वर्ग खोल्या पाहून तावडे दांपत्य भारावून गेले.

तर भविष्यात प्रशालेसाठी विविध सामाजिक संस्थांमार्फत शाळेला आर्थिक मदत व सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक संतोष राऊत व प्रशालेचे सिनिअर क्लर्क अनिल करंगुटकर व जुनिअर क्लर्क तेजस चौगुले उपस्थित होते. तसेच विवेक तावडे यांनी प्रशालेस भेट दिल्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष – भाऊ राणे, सचिव महेश कोळसुळकर, खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी त्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!