चौके (प्रतिनिधी) : सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट, व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम स्मृतीस्थळ कावळेवाडी वराड येथे करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिरात हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, यूरोलॉजी तपासणी, अस्थिरोग तपासणी, जनरल सर्जरी, नेफ्रोलॉजी तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग चिकित्सा, प्रसुतीशास्त्र आणि स्त्री रोग तपासणी, मोफत रक्त तपासणी, इसीजी व मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराचा मालवण, वराड, कट्टा, नांदोस, गुरामवाडी, कावळेवाडी या भागातील सुमारे 167 गरजू ग्रामस्थांनी लाभ घेतला.
यावेळी कै. डी . बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी तसेच समस्त ढोलम कुटुंबीय यांच्यावतीने प्रा . डी. बी. ढोलम यांचे समाजकार्य अशा पद्धतीने पुढे सुरू ठेवण्यासाठी असेच समाजोपयोगी उपक्रम यापुढेही राबविले जातील असे सांगितले. यावेळी देवेन (पप्पू) ढोलम, कै डी बी ढोलम यांच्या मुली बेबी, रेखा, मनीषा, दादा रावले, महादेव मलये, अनिल फणसेकर, छोटू ढोलम, बाबा ढोलम, अवधूत चव्हाण, सुनील पोखरणकर, प्रनेश ढोलम, गणपत पोखरणकर , नितेश खडपे, विकास लुडबे, नितीन लुडबे , आश्विन ढोलम, अनिल चव्हाण, परमानंद वेंगुर्लेकर, सतीश वेंगुर्लेकर,योगेश वेंगुर्लेकर, अवधूत वेंगुर्लेकर, रोहन चव्हाण, प्रेम परब, दिलीप वेंगुर्लेकर, डॉ.प्रथमेश वालावलकर, दिपक भोगटे, समीर रावले, प्रवीण मीठबावकर , सागर चव्हाण, ऍड. प्रदीप मिठबावकर, गणेश वाईरकर, वंदेश ढोलम, प्रसाद शिरोडकर, शिवा शिरोडकर, विनू चव्हाण तसेच कै डी.बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी चे सदस्य व कावळेवाडी लुडबेवाडीतील ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.