कोल्हापूर (प्रतिनिधी) : वेताळ वाचा नावाने चांगभलं.. शिवाजी पेठ येथील वेताळ देव पालखी सोहळा भक्तीपूर्व वातावरणात संपन्न. भाविकांच्या प्रचंड उत्साहात रात्री उशिरापर्यंत पालखी सोहळा रंगला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी धार्मिक विधी आरती महाभिषेक सोहळा करण्यात आला. वेताळ देवाची पूजा संग्राम राऊत आशिष राऊत यांनी बांधली. सायंकाळी सातच्या सुमारास आमदार राजेश क्षीरसागर,सागर कोरणे,उत्तम कोरणे,आदिल फरास शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, अजिंक्य चव्हाण,विजय जाधव, महेश जाधव, यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. ढोल ताशे धनगरी ढोल प्रत्येक तालीम मंडळाच्या दारात डीजे, वेताळ तालीम परिसरातील प्रत्येक गल्ली बोळात फुलांच्या पायघड्या रांगोळीची अरास करण्यात आली होती. वेताळ तालीम मंडळ नेताजी तरुण मंडळ नाईटकट्टा राहुल गल्ली, खंडोबा देवालय रोड आधी परिसरात पालखी सोहळा झाला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनुप पाटील,अभिजीत यादव, स्वप्नील टिटवेकर, अनिकेत नरके,आशुतोष जगताप, विश्वनिल जगताप, गणपती पांडे, रमण पाटील, प्रणील वडगे, गोपाळ राऊत, प्रणिल राऊत, गणेश जाधव,सुधाकर पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.