कुडाळ मधील दत्तभक्तांची कुडाळ ते माणगाव पायी वारी

दत्त जयंती निमित्त सलग पंधरा वर्षे पायी चालत जाऊन घेतात श्री.दत्त महाराजांचे दर्शन

चौके (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील दत्तभक्तांनी दत्त जयंती निमित्त कुडाळ ते माणगाव अशी पायी यात्रा करत पहाटे माणगाव दत्त मंदिरात पोहोचत श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. कुडाळ शहरातील चायना टाऊन हॉटेल येथे सर्वजण एकत्र येऊन रात्रौ 12.45 वाजता माणगाव दत्त मंदिर च्या दिशेने पायी प्रस्थान करून सर्वजण आज पहाटे 4.30 वाजता माणगाव दत्त मंदिरात दाखल झाले. आणि दत्त जयंती उत्सवानिमित्त पहाटेच्या काकड आरती मध्ये सहभाग घेऊन श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. गेली सलग पंधरा वर्षे ही परंपरा सर्वजण मनोभावे जोपासत आहेत.

या पायी वारीमध्ये कुडाळ शहरातून अभय शिरसाट, नितीन शिरसाट, सतीश हर्लीकुप्पी, रत्नाकर प्रभू तेंडोलकर, सुनील तळेकर, नितीन सामंत, सुनील कुडाळकर, प्रमोद नाईक, समर्थ साळवी, नारायण मुत्तल, कु. दीक्षा नाईक,योजना सामंत, विल्यम फर्नांडिस, मंगेश नाबर, वृणाल कुंभार, वनिता देसाई, नेहा सामंत, स्नेहा हर्लीकुप्पी,पद्मा वेंगुर्लेकर, आनंद वेंगुर्लेकर, राजश्री सामंत, वेदिका मांडकुलकर, भीमा वडियार, रोहन शिरसाट, प्रशांत प्रभू,जतीन शिरसाट, स्नेहल कुडाळकर, सुमित कुडाळकर, जय कुंभार आदी जण सहभागी झाले होते.

error: Content is protected !!