. चौके (प्रतिनिधी) : राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत कै .पांडुरंग सरनाईक जयंती निमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट ता.मालवण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 9 शाळांनी भाग घेतला होता व 16 विद्यार्थी सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्पर्धेचे नियम विद्यार्थ्यांना सांगून स्पर्धा सुरू करण्यात आली. स्पर्धा शांततेत पार पडली. लागलीच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेचे महत्त्व व त्याचे फायदे परीक्षकांनी सांगितले व राधारंग फाउंडेशनच्या विविध योजनांची माहिती विलास सरनाईक यांनी दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक पी.एच .कुबल यांनी राधारंगच्या उपक्रमांची स्तुती व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी राधारंग फाउंडेशन चे खजिनदार श्री सचिन सामंत यांनी वकृत्व स्पर्धा राबविण्यामागचा आपल्या संस्थेच्या उद्देश स्पष्ट केला व सर्व आयोजकांचे व शाळा प्रशासनाचे आभार मानले. राधारंगच्या ज्येष्ठ ,सर्वांच्या मार्गदर्शक सर्वांना स्फूर्ती देणाऱ्या अरुणा सामंत यांनी कै. पांडुरंग सरनाईक यांचा जीवन पट सर्वांसमोर मांडला. या स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक कु.ध्रुवी महेश भाट .वराडकर हायस्कूल कट्टा, द्वितीय क्रमांक कु .पार्थ प्रदीप सामंत .टोपीवाला हायस्कूल मालवण, तृतीय क्रमांक कु.धृती केशव भोगले .भरतगड इंग्लिश मीडीअम स्कूल मसुरे, उत्तेजनार्थ कु.विशाखा विवेक पारकर शिरवंडे हायस्कूल असा परीक्षकांनी जाहीर केला .
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विनोद सातार्डेकर (केंद्र शाळा मसुरे) व संजय पेंडुरकर (वराडकर हायस्कूल कट्टा) लाभले होते. यावेळी राधारंग च्या सर्व मान्यवरांनी भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे मनःपूर्वक आभार मानले कारण त्यांनी या कार्यक्रमासाठी श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटचा हॉल दिला होता त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक पीएच कुबल यांचेही मनःपूर्वक आभार मानले कारण त्यांनी या स्पर्धेला लागणारी सर्व व्यवस्था पुरविली व प्रशालेच्या शिक्षक वर्गांनीही कार्यक्रमाला प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपलब्ध करून दिले त्यांचेही आभार मानण्यातआले. या
वेळी माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य शरद लाड, चौके हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक दत्तप्रसाद परुळेकर ,हिवाळे हायस्कूलच्या पूर्वा आंगणे, तसेच मालवण तालुक्यातील प्रसिद्ध सिव्हील इंजिनियर प्रदीप सामंत ,माड्याचीवाडी कुडाळ चे नाईक, शिंगरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एम .एस. एफ. सी. विभागाच्या निदेशिका हर्षदा पाटकर कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास सरनाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन केशव भोगले यांनी केले.