ग्रामदैवत सकलेश्वर मंदिर परिसराची केली साफसफाई
चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबेरी गावातील जिल्हा परिषद न.1 शाळा या शाळेतील मुलांनी श्रमदानातून मंदिर परिसरात स्वच्छता करीत एक नवीन आदर्श आंबेरी गावापुढे ठेवला. रविवार दिनांक 24 रोजी आंबेरी ग्रामदैवत श्री देव सकलेश्वर वार्षिक जत्रोत्सव पार पडला. यानिमित्ताने गावात मंदिर परिसरात अनेक दुकाने लागली होती. यामुळे मंदिर परिसरात बराच कचरा पडलेला होता. ही बाब आंबेरी नं 1 शाळेचे मुख्याध्यापक धानजी चव्हाण यांच्या लक्षात येताच सरांनी गावातील तिन्ही शाळेतील शिक्षक व मुलांना एकत्रित करून मुलांच्या अंगी स्वच्छता व श्रमप्रतिष्ठा ही मूल्ये अंगी रुजवी या उद्देशाने परिसराची स्वच्छता करवून घेतली. यावेळी आंबेरी गावातील तिन्ही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याचे आंबेरी गावचे सरपंच मनोहर डिचोलकर यांनी उपस्थित राहून कौतुक केले. या उपक्रमात आंबेरी नं 1, आंबेरी वाक व आंबेरी मळा या शाळेतील मुलांनी सहभाग घेतला.
यावेळी आंबेरी नं. 1 शाळेतील पदवीधर शिक्षिका गायत्री गिरकर,उपशिक्षक रश्मी काळसेकर, मनीषा ठाकर, आंबेरी वाक शाळेचे मुख्याध्यापक उदय गोसावी, उपशिक्षिका स्वप्नाली माळेकर, आंबेरी मळा शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत कदम उपस्थित होते.














