फणसगाव पीएचसी ला 8 दिवसांत कायमस्वरूपी डॉक्टर द्या

अन्यथा जनआक्रोशन ; फणसगाव पंचक्रोशीवासीयांचा इशारा

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील 2 महिने वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असणाऱ्या फणसगाव पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेला वैद्यकीय उपचारांची असुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसांत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त ज केल्यास जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा उदय पाटील, बंड्या नारकर, कृष्णा नर आदींसह पंचक्रोशीवासीयानी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या लेखी निवेदनात फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी होत असलेली गैरसोय नमूद केली आहे. दररोज 100 ते 120 बाह्यरुग्ण तपासणी असणाऱ्या फणसगाव पीएचसी मध्ये डॉक्टरच नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी द्या अन्यथा जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!