आनंदीबाई रावराणे महाविद्यलयाचा हर्ष सावंत याला सुवर्णपदक

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. हर्ष अभिजीत सावंत यांने  पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ०८ डिसेंबर २०२४ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली ता. कल्याण येथे मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थी कु.हर्ष अभिजीत सावंत याने १०५ ते १२० किलो वजनी गटातून सहभागी झाला होता, या गटामध्ये त्याने एकूण ६१३ किलो वजन उचलून या गटातून सुवर्णपदक प्राप्त केले. हर्ष सावंतचे संस्थापदाधिकारी, प्र.प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!