आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत जय पेडणेकर व श्रेया सामंत विजेते.

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे  कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयात आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटातून कणकवली महाविद्यालयाचा विद्यार्थी जय पेडणेकर तर मुलींच्या गटातून डॉन बॉस्को महाविद्यालय ओरोसची विद्यार्थिनी श्रेया सामंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिमखाना विभागाने शहीद मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृहामध्ये कनिष्ठ महाविद्यलयीन  बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मुलांच्या गटातील विजेतेपद अनुक्रमे कणकवली महाविद्यालयातील जय किशोर पेडणेकर, अमन अशोक बागवान, आणि धनराज शंकर खोदलेकर यांनी पटकावले. मुलींच्या गटात अनुक्रमे डॉन डॉन बॉस्को ओरस श्रेया श्रीकांत सामंत, कनिष्ठ महाविद्यालयाची पूर्वा सुभाष पवार, (आचिर्णे आणि श्रुती राजेश खानोलकर (कासार्डे कनिष्ठ महाविद्यालय) यांनी पटकावला. या स्पर्धेत कै.हेमंत केशव रावराणे, वैभववाडी,  कासार्डे, तळेरे, कणकवली, आचिर्णे आणि डॉन बॉस्को, ओरोस या कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था स्थानिक समिती अध्यक्ष श्री.सजनक्का रावराणे,  विश्वस्त शरदचंद्र रावराणे, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे व जिमखाना प्रमुख एस. बी. पाटील उपस्थित होते. बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुळेकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व विजेत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पंच म्हणून अशोक पाटील, किशोर पेडणेकर, संतोष पेडणेकर, अमोल येनगे आणि सर्वेश सोनम यांनी काम पाहिले. विजेत्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापदाधिकारी, प्र. प्राचार्य, जिमखाना विभाग, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!