श्री दत्ता भाऊ पवार परिवार आणि गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्या संयुक्त निबंध स्पर्धा संपन्न
आचरा (प्रतिनिधी) : श्री दत्ता भाऊ पवार परिवार आणि गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत मातोश्री शालिनी शिवराम पवार यांच्या २१ व्या स्मृतिदिना निमित्त जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटात निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचा विषय होता. वात्सल्यसिंधू आई, लहान गटात १३ तर मोठ्या गटात ३२ स्पर्धक अशा एकूण ४५ स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग नोंदविला. स्पर्धा आयोजनाची जबाबदारी सुरेंद्र सकपाळ, एकनाथ गायकवाड, प्रशांत गोसावी व अमेय लेले पार पाडली.
लहान गट बक्षीसं प्रथम क्रमांक रु.१०००/- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक (आई समजुन घेताना), द्वितीय क्रमांक रु. ७००/- रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक तृतीय क्रमांक रु. ५००/- रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक आणि मोठा गट प्रथम क्रमांक रु. १५००/- रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक, द्वितीय क्रमांक रु. १०००/- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक, तृतीय क्रमांक रु.५००/- स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक तर दोन्ही गटांना उत्तेजनार्थ प्रथम रु.३००/- रोख व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ द्वितीय रु २००/- व प्रमाणपत्र अशी बक्षीसं देण्यात येणार असुन सदर बक्षीसं वितरण सोहळा गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीताच्या समारंभपूर्वक केला जाणार आहे.












