आशिये येथे लय समर्पण कार्यक्रम संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : जगद्विख्यात तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना सांगीतिक मानवंदना म्हणून षड्ज ग्राम फाउंडेशन प्रस्तुत ‘लय समर्पण’ हा शास्त्रीय गायन – वादनाचा कार्यक्रम 18 जानेवारी रोजी श्री दत्तक्षेत्र, आशिये, कणकवली येथे संपन्न झाला. सुरुवातीला उस्तादजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. युवा गायक हर्ष नकाशे यांनी मधुवंती हा राग सादर केला. संवादिनीवर साथसंगत निनाद जोशी आणि तबल्यावर वेदांत कुयेस्कर यांनी केली.

दुसऱ्या सत्रात तनय रेगे यांच्या शास्त्रीय एकल तबलावादनाने कार्यक्रमात रंगत आणली. त्यांनी ताल तीनताल त्याच्यामध्ये पेशकार, कायदा, रेले, चक्रधार अशा अनेक तबलावादनातील संकल्पना वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तनय रेगे यांना संवादिनी वर संगत श्री. निनाद जोशी यांनी केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष मयूर कुलकर्णी यांनी संस्थेबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा प्रभू यांनी केले. या कार्यक्रमात गंधर्व फाउंडेशनचे मनोज मेस्त्री, संजय कात्रे, संतोष सुतार, विश्रांती कोयंडे, शौरीन देसाई, पांडुरंग करंबेळकर, निखिल कसराळकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!