नांदगाव (प्रतिनिधी) : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब कणकवली तालुक्यातील असलदे शिवसेना शाखेत ठाकरे पक्षाच्या वतीने सकाळी दहा वाजता हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात येईल व दुपारी चार वाजता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमास असलदे गावातील महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन सारिका खरात कासारडे महिला विभाग प्रमुख, संजय डगरे शिवसेना शाखाप्रमुख, स्वरा डगरे महिला शाखा प्रमुख, सपना डामरे ग्रा प सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने आवाहन करण्यात आले.











